1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जून 2018 (09:16 IST)

अमृता खानविलकर लवकरच वेबसीरिजमध्ये

after raazi amruta khanvilkar
अमृता खानविलकर लवकरच डिजिटल दुनियेत डेब्यू होणार आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे. अमृता आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल. लवकरच सुरू होणा-या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही वेबसीरीजमध्‍ये अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता दिसणार असल्याचं समजतंय. 'अमृताने आपल्या आजवरच्या करिअरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.' 
 
धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'राजी' सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ब़ॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अमृताची ही भूमिका प्रेक्षकांच्‍या पसंतीसही उतरली.