गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 30 मे 2018 (13:27 IST)

सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या चाहत्यांनी गाण्याद्वारे व्यक्त केले प्रेम

Swwapnil Joshi Song | Tribute to SJ & ... by Kunal Shiinde | Singer Aadil Shaikh
आपल्या लाडक्या अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांचे चाहते अनेक क्लृपत्या लढवत असतात. अंगावर नाव गोंदवून घेण्यापासून ते अगदी कलाकारांच्या घरी भेटवस्तू पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टी ही चाहतेमंडळी करतात. मराठीचा चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्नील जोशीच्या चाहत्यांनी देखील अशीच एक सुंदर भेटवस्तू स्वप्नीलला देऊ केली आहे. कुणाल शिंदे या चाहत्याने एसजे फेन्स ग्रुपच्या वतीने 'स्वप्न नव्या आकाशात..'असे बोल असलेले गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करत स्वप्नीलला सुंदर भेट देऊ केली. या गाण्यामधून स्वप्नीलच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेतला असून त्याने गाजवलेल्या मलिका आणि चित्रपटांचादेखील यात उल्लेख आहे.
'चाहत्यांकडून मिळत असलेल्या भरघोस प्रेमामुळेच, मी आजवर इथपर्यंत आलो आहे. माझ्या कामाला दुजोरा देणारे माझे हे सर्व चाहते मला खूप प्रिय असून त्यांच्या माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी पर्यंत करीन' असे आश्वासन स्वप्नील त्याच्या चाहत्यांना देतो.