testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रियांका करणार मराठी सिनेमा

priyanka
Last Modified शनिवार, 19 मे 2018 (12:09 IST)
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव असलेला हा सिनेमा एका सत्यकथेवर अधारित असणार आहे. चांगली कथा आणि चांगली प्रतिभा प्रेक्षकांसोर आणण्यासाठीच आपण पर्पल पेबल पिक्चर्स ही प्रॉडक्शन कंपनी सुरु केल्याचे ती म्हणाली. 'पाणी' ही केवळ सत्यकथा आहे म्हणून नव्हे तर यातून एक सामाजिक मुद्दाही उपस्थित केला जाणार असल्याने याची निर्मिती आपण करणार असल्याचेही तिने सांगितले. प्रियांकाने सोशल मीडियावर एक ब्लू मोशल पोस्टर शेअर करून आपल्या चौथ्या मराठी सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. 'पाणी'चे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे. प्रियांकाने यापूर्वी 'व्हेंटिलेटर', 'काय रे रास्कला' आणि 'फायरब्रॅन्ड' या तीन मराठी सिनेमांचे प्रॉडक्शन केले आहे. प्रियांका गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच अ‍ॅक्टिव्ह होती. 'क्वांटिगो' ही तिची सिरीयल सुरूवातीला तर खूप चर्चेत होती. प्रियांका भारतात परत आली आहे आणि तिने आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामावर लक्ष केंद्रितकरायचे ठरवले आहे.


यावर अधिक वाचा :

'पिप्सी'चा रंजक प्रवास लवकरच

national news
लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै ...

'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल (Video)

national news
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय ...

अंगुरी भाभीचा बोल्ड अंदाज, बिकीनीतले फोटो केले शेअर

national news
लोकप्रिय टीव्ही सीरियल भाभीजी घर पर है मधील अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेचा ...

चिमुटभर आनंद

national news
सकाळी सकाळी एकीने चिमुटभर आनंद दिला. नियमित फिरायला येणारी ती, रोज समोरून जायची. ओळखपाळख ...

"पॉश" या शब्दाची व्याख्या

national news
रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे.. प्लास्टिकचे डबे...जुन्या वाट्या, ...