शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

परफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारण्याविषयी चर्चेत आहे. आमिरद्वारे कृष्णाची भूमिका साकारण्याबाबत विरोधाचे स्वरही उमटताना दिसून येत आहेत. त्याचदरम्यान आता आमिरनेदेखील आपल्या वतीने ही भूमिका साकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.
 
आमिरचे मानने आहे की हिंदू पुराण खूप जटिल आहे व आता तो महाभारतावर बनत असलेल्या या वेब सीरीजमध्ये काम करण्यासाठी फेरविचार करत आहे. आमिरला पद्मावतवरुन झालेल्या वादाची पूर्ण कल्पना आहे व त्यामुळे तो अशा वादांपासून दूर राहणे पसंत करतो. आमिर खना यापूर्वीही असहिष्णुतेवरील आपल्या वक्तव्यामुळे ट्रोलर्सचा शिकार ठरला होता. आमिरने या मुद्यावरुन केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्याच्यावर देशभरातून टीका झाली होती व त्यामुळे आमिरला प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते.