1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (14:17 IST)

दिलदार बाहुबली! जीम ट्रेनरला दिली मोठी भेट

Dildar Bahubali
तेलुगू चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभास. ‘बाहुबली' या चित्रपटानंतर तो लोकप्रितेच्या शिखरावर पोहोचला. आता तो सर्वाधिक मानधन घेणार अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. नुकताच प्रभासने त्याच्या जीमट्रेनरला एक महागडी कार गिफ्ट म्हणून दिलच्याची चर्चा रंगली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभास जीम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे. नुकताच प्रभासने त्यांना रेंज रोवर वेलार ही कार भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत जवळपास 73 लाख रुपये आहे. 
 
लवकरच प्रभासचा ‘राधे श्याम' हा चित्रपट प्रेक्षकांच भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटात तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. प्रभासचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘आदिपुरुष' असे आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे.