testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘डोंगरी का राजा’मध्ये सनीचा आयटम नंबर!

नव्या आयटम साँगमध्ये बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला असून तिने ठुमके ‘मेरी चोली ब्लॉकबस्टर लगे’ या गाण्यावर लावले आहेत. आगामी ‘डोंगरी का राजा’ या चित्रपटातील हे आयटम साँग आहे.
हे गाणे ‘बेबी डॉल’ आणि ‘पिंक लिप्स’ यासारखी हिट गाणी बनवणार्‍या मीत ब्रदर्सने संगीतबध्द केले आहे.

‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘फेविकॉल से’ या गाण्याची गायिका ममता शर्माने हे गीत गायिले आहे.

या गाण्यावर आपल्या लौकिकानुसार सनीने डान्स केला असून, हे गाणेही आधीच्या गाण्यांसारखेच लोकप्रिय ठरु शकते. 24 तासात या गाण्याला 10 लाख वेळा पाहिले गेले आहे.‘


यावर अधिक वाचा :