सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (23:06 IST)

प्रसिद्ध गायक बी प्राक यांच्या नवजात मुलीचे निधन

प्रसिद्ध गायक बी प्राक त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल खूप उत्साहित होते पण आता सिंगरने एक वाईट बातमी दिली आहे. बी प्राकची पत्नी मीरा हिने एका मुलीला जन्म दिला, पण जन्मानंतर लगेचच मुलीचे निधन झाले. या घटनेने बी प्राक आणि मीराला पूर्णपणे हादरवून टाकले आहे. सिंगरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये सिंगरने सांगितले की,ते सध्याच्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.
 
बी प्राकने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'अत्यंत दु:खाने कळवावे लागते की आमच्या नवजात बाळाचे जन्मावेळी निधन झाले आहे. पालक म्हणून आपण ज्या काळातून जात आहोत. हे सर्वात वेदनादायक आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार मानू इच्छितो. या दु:खाने आम्ही हादरलो आहोत. आपण सर्वांनी कृपया यावेळी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी ही विनंती. मीरा आणि बी प्राक.

बी प्राकच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत शोक व्यक्त केला जात आहे.
बी प्राक आणि मीरा यांचा विवाह 4 एप्रिल 2019 रोजी झाला होता. लग्नानंतर 2020 मध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव अदब आहे. त्याचवेळी, या वर्षी एप्रिल महिन्यातच सिंगरने खुलासा केला होता की त्याची पत्नी गरोदर आहे आणि लवकरच तो आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहे. पण आज अशीही दुःखद वार्ता समजली.