testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

''गोल्ड'' चा फर्स्ट लूक जारी

akshay kumar
अक्षय कुमारचा आगामी ''गोल्ड'' सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.
अक्षयने ट्विटर अकाऊंटवर ''गोल्ड'' सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

''गोल्ड सिनेमाचा पहिला दिवस, नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत'', असेही अक्षयनं ट्विटमध्ये लिहिले आहे. या सिनेमात अक्षय जरा हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे. ''गोल्ड'' सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा एक्सल एन्टरटेन्मेन्टचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करत आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनी रॉयची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सिनेमाद्वारे मोनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करत आहे. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडनमध्ये आयोजित चौदाव्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.


यावर अधिक वाचा :