1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (11:57 IST)

टॉम क्रूझच्या तुलनेत अधिक चांगली स्टंटबाजी करु शकते: कंगना

kangana tom cruise tweet
मुंबई- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता थेट हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला आवाहान दिले आहे. कंगनाने दावा केला आहे की ती टॉमपेक्षा अधिक चांगली स्टंटबाजी करु शकते.
 
स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध टॉम क्रूझचे अनेक चाहते आहे. मिशन इम्पॉसिबल चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्वत: स्टंट केले आहे. मात्र आता टॉमच्या तुलनेत मी चांगले स्टंट करु शकते असा अजब दावा कंगनाने केला आहे. 
 
कंगनाने ट्वीट केले आहे की “हा...हा...हा... माझी स्तुती ऐकून टीकाकार परेशान आहेत. कारण निक पॉल म्हणाले, मी टॉम क्रूझ पेक्षा चांगली स्टंटबाजी करते. हे ऐकून टीकाकार नक्कीच चकित झाले असणार.” असे म्हणत आता कंगनाने स्वत:ची तुलना टॉम क्रूजशी केली आहे.
 
तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरले आहे.