testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

इम्तियाजसोबत पुन्हा आलिया!

तब्बल तीन वर्षांपूर्वी रणदीप हुडाबरोबर दिग्दर्शक इमि्तयाज अलीचा चित्रपट हायवेमध्ये दिसून आलेली आलिया भट्ट पुन्हा एकदा इम्तियाजच्या एका चित्रपटामध्ये काम करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अखेरच्या वेळेस शाहरूख खान व अनुष्का शर्माला घेऊन जब हॅरी मेट सेजलसारखा चित्रपट बनविणारा इम्तियाज आता आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारी लागला आहे व यामध्ये रणबीर कपूरबरोबर आलियाची निवड करण्याची त्याची इच्छा आहे.
यापूर्वीदेखील इम्तियाजने रणबीरला घेऊन रॉकस्टार व तमाशासारखे चित्रपट बनवले आहेत आणि आता पुन्हा एकदा रणबीरबरोबर चित्रपट करण्याची त्याची इच्छा आहे. या चित्रपटाविषयी इम्तियाजने रणबीर व आलियाबरोबर चर्चादेखील सुरू केली आहे परंतू अद्याप काहीही फायनल झालेले नाही. जर खरोखरच इम्तियाजच्या या चित्रपटामध्ये रणबीर व आलिया काम करण्यास तयार झाले तर त्यांचा एकत्र काम करत असलेला हा दुसरा चित्रपट असेल. कारण यापूर्वीच त्यांनी अयान मुखर्जीचा एक चित्रपट ड्रॅगनमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. अखेरच्या वेळेस बद्रीनाथ की दुल्हनियामध्ये दिसलेली आलिया सध्या राजीमध्ये काम करत आहे.


यावर अधिक वाचा :