Widgets Magazine

''जब हॅरी मेट सेजल''चे पहिले पोस्टर रिलीज

jab-harry-met-sejal
Last Modified शुक्रवार, 9 जून 2017 (11:06 IST)
शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा ''जब हॅरी मेट सेजल''चे
पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं पोस्टर शाहरूख आणि अनुष्कानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.
शाहरूख आणि अनुष्काच्या या सिनेमाच्या नावावरुन बराच वेळ चर्चा सुरू आली. मात्र सिनेमाचं नाव काही केल्या निश्चित होत नव्हते.
सुरुवातीला या सिनेमाचं नाव ''द रिंग'' असल्याची चर्चा होती, त्यानंतर ''रहनुमा'' असेल अशी माहिती समोर आली. पण अखेर ''जब हॅरी मेट सेजल'' असे सिनेमाचं नाव निश्चित करण्यात आले आहे. जब हॅरी मेट सेजल'' हा एक रोमाँटिक सिनेमा आहे, ज्यात दोन वेगवेगळ्या देशात राहणारे म्हणजेच हॅरी(शाहरूख) आणि सेजल (अनुष्का) यांना एकमेकांसोबत प्रेम होते.


यावर अधिक वाचा :