Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीदेवीची मुलगी बनणार करणची 'आर्ची'?

शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (11:57 IST)

सगळ्यांनाच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची उत्सुकता असून बॉलिवूडमध्ये जान्हवीला लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. जान्हवी बॉलिवूडमध्ये 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून पदार्पण करणार  असल्याची आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची-परश्याच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावले. मराठी  चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याल लावले होते. या चित्रपटाने दिग्दर्शक करण जोहरलाही भुरळ पाडली असून त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतल्याची चर्चा आहे. 
 
सुपर डुपर हिट 'सैराट' झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र, अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि झी एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे कथानक बर्‍यापैकी 'सैराट' सारखेच राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. याच चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'सैराट'च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

‘कोल्ड प्ले’ला हिरवा कंदील

येत्या १९ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला उच्च ...

news

पॅरिसमध्ये मल्लिकाला मारहाण, हल्लेखोरांनी लुटले

पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला मारहाण झाली आहे. यात मल्लिका घराबाहेर पडली ...

news

बँकेच्या रांगेत सलमान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पाठराखण केली असून सलमानने भारतीय ...

news

ट्विंकलचे नवीन पुस्तक प्रसिद्ध (फोटो)

ट्विंकल खन्ना एका लेखकच्या रूपात प्रसिद्धी मिळवत आहे. तिचे नवीन पुस्तक 'द लीजेण्ड्‍स ऑफ ...

Widgets Magazine