Widgets Magazine

चित्रपट करियर हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे – काजोल

Last Modified शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:08 IST)
सिनेसृष्टीपासून कांहीशी दूर गेलेल्या काजोलला प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. काजोलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलांच्या जबाबदारीमुळे करियरचा त्याग केला नसल्याचे सांगितले. मुले झाली कारण मलाच त्यांची जबाबदारी घ्यायची होती असे सांगितले. मुले माझी आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यावर प्रेमच करणार असे ती म्हणाली.
माझ्या आयुष्यात माझे कुटुंब व मुले यांना सर्वाधिक प्राधान्य आहे आणि तेच माझे आयुष्यही आहे. चित्रपट करियर हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे.
चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण करणारी काजोल एकेकाळी प्रादेशिक चित्रपटात काम करण्यास नकार देत असे. मात्र आता ती धनुषसोबत तमीळ चित्रपटात दिसणार आहे. ती म्हणते, चित्रपटसृष्टी खूप बदलली आहे, खूप नवे लोक आले आहेत. स्टार व स्टारडम यांची व्याख्या बदलली आहे.
प्रादेशिक चित्रपटात काम करण्यात भाषेचा प्रश्न यायचा त्यामुळे मी नकार देत असे पण आता मी चीनी चित्रपटातही भूमिका करू शकेन असा मला विश्वास आला आहे.


यावर अधिक वाचा :