सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कंगना चढणार बोहल्यावर

अभिनेता ऋतिक रोशनबरोबर दिलेल्या कायदेशीर लढ्यामुळे चर्चेत आलेली कंगना राणावत आपल्या चाहत्यांना या वर्षी एक मोठे सरप्राईज देणार आहे. अलीकडेच टीव्ही शो इनसाइड एक्सेसच्या प्रोमोमध्ये स्वत: कंगना राणावतने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जेव्हा शोच्या होस्टने कंगनाला 2017 मध्ये बॉलीवूड व आपल्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टीविषयी काही सांगाल का, अशी विचारणा केली असता कंगना म्हणाली की माझा विवाह होणार आहे. कंगनाने ज्या व्यक्तीबरोबर विवाह होणार आहे, त्याच्याविषयी माहिती देण्यास मात्र नकार दिला. अलीकडेच कंगनाने आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कंगनाने ऋतिकबरोबर झालेल्या बेबनावाबद्दल बोलताना सांगितले की जेव्हा तिची खासगी पत्रे सार्वजनिक करण्यात आली, तेव्हा मला खूप वाईट वाटले. झोपताना सतत डोळे भरून यायचे. त्यावेळेस मला असे वाटले होते की जसे काही मी संपूर्ण जगासमोर उघडी पडली आहे. अनेक रात्री मी रडत घालविल्या आहेत. माझ्याविषयी खूप वाईट बोलले जात होते. माझ्या मित्रमंडळींमध्ये मी मस्करीचा विषय बनले होते, जेव्हा माझे मि‍त्र याविषयी माझ्याजवळ बोलायचे, तेव्हा मी कोणत्याही गोष्टींना उत्तरे देत नव्हते. मला कोणत्याही प्रकारे वाद वाढवायचे नव्हते. आता मला स्वत:ला जिंकल्यासारखे वाटत आहे.