Widgets Magazine
Widgets Magazine

कंगना रणावत जखमी, डोक्याला 15 टाके पडले

शुक्रवार, 21 जुलै 2017 (11:48 IST)

अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’ या तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला जात होता, त्याचवेळी तलवार कंगनाच्या डोक्याला लागली आणि ती जखमी झाली.
 

हैदराबादमध्ये या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. या घटनेनंतर कंगनाला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला 15 टाके पडले असून आणखी काही दिवस तिला रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सीनची तयारी अनेकदा केली होती. मात्र शूटिंग करताना थोडा गोंधळ झाला. निहार पंड्या कंगनावर तलवारीने वार करतो तेव्हा कंगनाला डोकं खाली झुकवायचं असतं. मात्र वेळ चुकली आणि कंगनाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तलवार लागली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती सिनेमाचे निर्माते कमल जैन यांनी दिली.
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

अजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे, फर्स्ट लूक शेअर

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच ...

news

दिलवाले अखेर बंद होणार : मराठा मंदिर

मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अर्थात ‘डीडीएलजे’ नियमितपणे गेली ...

news

सोनाक्षीला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून टीका

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळ्यात सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून सोशलमिडीयात ...

news

अभिनेत्री बिदिशा बेजबरूने केली आत्महत्या

नुकताच प्रदर्शित झालेला जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्री बिदिशा बेजबरूने आत्महत्या केली ...

Widgets Magazine