रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करण आता ईशान खट्टरसोबत कधीच चित्रपट करणार नाही !

नेहमी आपल्या वायफळ बडबडीमुळे लाइटमध्ये येणार्‍या वादग्रस्त अभिनेता कमाल खान उर्फ केआरके याने पुन्हा एक धक्कादायक ट्वीट केले आहे. केआरकेने दावा केला आहे की करण जोहर आता कधीच धडक फेम ईशान खट्टरसोबत चित्रपट करणार नाही कारण ईशानने करणसोबत उद्धटपणे बोलला...
 
केआरकेप्रमाणे करणने ईशानला धर्मा प्रॉडक्शनमधून बाहेर काढले आहे.
 
कंगना राणौतची बहीण रंगोली हिने देखील केआरकेच्या या ट्वीटला बळ दिले असून म्हटले की करण जोहरसाठी असे करणे सामान्य आहेत. तो कलाकारांच्या कमाईचा मोठा भाग स्वत:कडे ठेवून घेतो आणि इतकेच नाही तर तो त्यावर काही अभिनेत्रींसोबत अफेयर करण्याबाबत दबाव टाकत होता. ईशानने नकार दिल्यास संतापलेल्या करणने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आता या दोघांच्या ट्वीटमुळे एका नव्या वादाला जन्म घातला आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा तर तर शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला करण जोहरने ‘धडक’ या चित्रपटातून त्याला लॉन्च केले होते. यात त्यासोबत श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरला देखील लॉन्च करण्यात आले होते.