शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (11:46 IST)

'छपाक'साठी पैसे स्वीकारणबाबत लक्ष्कीचा खुलासा

दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणार्‍या छपाक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या चित्रपटाविषयी अनेक चर्चा जोर धरु लागल्या आहेत. चित्रपटाची प्रसिद्धी म्हणू नका किंवा मग एखाद्या दृश्यासाठी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती. या चर्चांच्या वर्तुळात काहीशा नकारात्मक आणि भुवया उंचावणार्‍या मुद्यांनीही डोकं वर काढलं आहे. ज्यापैकी एक म्हणजे लक्ष्मी अग्रवाल, या अ‍ॅसिड हल्ला पीडितेची चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर असणारी नाराजी. लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील काही प्रसंगांचा आधार घेतला. या चित्रपटासाठी लक्ष्मीला 13 लाख रुपये इतकीच किंमत दिली गेल्यामुळे ती नाराज असलचं म्हटलं जात होतं. ज्याविषयी लक्ष्मीनेच तिची प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.
 
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत तिने एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. यामध्ये तिने या बातमीवर मोठी फुली मारली होती.
 
ज्याच्या कॅप्शनमध्ये हे खोटं असल्याचं तिने सांगितलं होतं. लक्ष्मीने केलेला हा खुलासा पाहता चर्चांना पूर्णविराम मिळेल, असं म्हणायला हरकत नाही.