मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (12:10 IST)

सेक्रेड गेम्स-२ ऑनलाईन लीक

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स-२'चा दुसरा सीझन १५ ऑगस्टला रिलीज झाला. मात्र 'सेक्रेड गेम्स'-२ ऑनलाईन लीक झाली आहे. वेब सीरीज सेक्रेड गेम्स नेटफ्लिक्सने रिलीज केल्यानंतर काही वेळामध्येच ही सीरीज लीक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड चित्रपट लीक करणाऱ्या तमिळ रॉकर्सने सेक्रेड गेम्स-२ ला ऑनलाईन लीक केले. सीरिजमध्ये सैफ, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, कल्कि कोचलिन, रणवीर शौरी आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.