सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:30 IST)

फातिमाला लागली चित्रपटांची लॉटरी

'दंगल'गर्ल फातिमा सना शेख टॉक ऑफ द टाऊन झाली आहे. 'दंगल' चित्रपटानंतर फातिमाचे नशीब उजळले. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटानंतर आणखी बिग बजेट चित्रपटांसाठी तिला ऑफर येत आहे.
 
सध्या फातिमा अनुराग बासू यांच्या मल्टिस्टारर चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तिला सैफ अली खानबरोबर चित्रपट करण्यास ऑफर   आली आहे. फातिमाला 'सैफ स्टारर तांत्रिक' चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाची टीम फातिमाच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. याआधी अभिषेक बच्चनला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते; मात्र त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला. आता सैफबरोबर फातिमाची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. पवन कृपलानीहा चित्रपट दिग्दर्शित करतील. आता फातिमा हा चित्रपट करण्यास होकार देते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.