सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बहुचर्चित ‘लव्ह सोनिया’ चा ट्रेलर रिलीज

‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला. हा चित्रपट देह विक्रय व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधतो. मृणाल ठाकूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. तिने यात सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात मृणाल ठाकूर, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, अनुपम खेर, रिचा चड्ढा, फ्रीडा पिंटो आणि आदिल हुसैन आहेत. जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्येचित्रपट गाजला आहे. अनुपम खेर आणि मनोज वाजपेयी यात एका सरप्राईज पॅकेजमध्ये दिसणार असल्याचे भासते. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या १४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.