testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजयच्या चित्रपटात अनिल-माधुरी

पुन्हा एकदा पडद्यावर बॉलीवूडमध्ये नव्वदच्या दशकातील सर्वात लोकप्रिय जोडींपैंकी एक अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी दिसणार असून ही जोडी धमाल चित्रपयाचा तिसरा सिक्वेल टोटल धमाल मधून एकत्र येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अजय देवगण, इंद्र कुमार यांच्यासोबत करणार आहे. संजय दत्तची या चित्रटाच्या पूर्वीच्या दोन भागांमध्ये प्रमुख भूमिका होती पण संजय या चित्रपटात यावेळी नसेल. डिसेंबर 2018 मध्ये टोटल धमाल रिलीज होणार असल्याची माहिती आहे. माधुरीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपण इंद्र कुमारासोबत अनेक दिवसांनी काम करणार असल्याचे सांगितले होते.

कॉमेडी चित्रपटात अनेक वर्षांपासून काम न केल्यामुळे हा चित्रपट आव्हानात्मक असेल असे माधुरीने म्हटले होते. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही नव्वदच्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय जोडी होती. ही जोडी शेवटची 2000 साली पुकार चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी अनिल कपूर आणि माधुरी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.


यावर अधिक वाचा :