testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मिताली म्हणते, प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी

mtali praiyanka
Last Modified मंगळवार, 10 जुलै 2018 (12:33 IST)
सध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक लवकरच येणार आहे. मितलीनं स्वतः यासाठी हिरवा कंदील दाखवला असून या चित्रपटात देसी गर्ल प्रियांकानं आपली भूमिका साकारावी अशी इच्छाही तिनं बोलून दाखवली आहे. मिताली राजचं आत्मचरित्रही या वर्षात प्रकाशित होणार आहे. तर दुसरीकडे मिताली राजच्या बायोपिकचंही काम सुरू आहे. मिताली स्वतः चित्रपटाच्या कथानकाकडेजातीनं लक्ष घालत आहे. 'प्रियांका चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. तिच्यात आणि माझ्यात खूपच साम्य आहे त्यामुळे तिनं माझी भूमिका साकारली तर मला आवडेल. मात्र ही माझी इच्छा असून त्याबद्दल अंतिम
निर्णय चित्रपट निर्माते घेतील' असं मितालीनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटर्सवर आधारित 'सचिनः अ बिलिअन ड्रीम', 'अजहर', 'एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी' असे चित्रपट आले आहेत. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. पण महिला क्रिकेटपटूवर आधारित हा पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियांकानं या आधी बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे मितालीच्या इच्छेचा मान राखत प्रियांका चित्रपटात काम करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...

'ठाकरे'मध्ये माँसाहेबांची भूकिासाकारणार अमृता

national news
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ...

कॉमेडी सर्कस पुन्हा एकदा सुरु

national news
कॉमेडी सर्कस या शोने चार वर्षापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा ...