सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 1 मे 2018 (12:58 IST)

मुमताज ठणठणीत; निधनाच्या चर्चेला पूर्णविराम

दोन-तीन दिवसांपासून अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मुमताज यांच्या निधनाचे अनेक फोटो आणि श्रद्धांजलीचे मेसेज शेअर केले जात होते. मात्र, या व्हायरल झालेल्या बातम्या खोट्या असून मुमताज यांची प्रकृती स्थिर असल्याचा खुलासा त्यांची मुलगी तान्या माधवानी यांनी इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर करून केला आहे.
 
त्यानंतर काही वेळाने त्यांनी मुमताज यांचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओध्ये ममुताज व्यवस्थितपणे बोलताना दिसतात. इतक्या वर्षानंतरही चाहत्यांना माझी काळजी आहे, माझ्याबद्दल इतके प्रेम आहे, हे पाहून मी अत्यंत भारावले असून मी अगदी ठणठणीत आहे, मला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. मी एकटी नसून माझ्या मुलांसोबत आनंदाने राहतेय असे मुमताज यांनी या व्हिडिओध्ये म्हटले आहे. मुमताज सध्या त्यांच्या मुलीसोबत रोममध्ये आहेत. त्यामुळे मुमताज यांच्या निधनाच्या चर्चेला पूर्णविराम ममिळाला आहे.
 
60-70 च्या दशकात मुमताज यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. हिंदी चित्रटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणार्‍या मुमताज यांच्या सौंदर्यावर तर अनेकजण भाळले होते. नाकीडोळी सुंदर, रेखीव आणि त्या काळी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणार्‍या या अभिनेत्रीचा जन्म एका मध्यवर्गीय मुस्लीम कुटुंबात झाला होता.