बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (11:43 IST)

शाहरुखला भेटायला आलेली लीपा अडकली वाहतूक कोंडीत

आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लीपा 'वन प्लस म्युझिक फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. तिने पॉपस्टार केटी पेरीसह परफॉर्मन्स करण्यापूर्वी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची भेट घेतली. दुआ लीपा शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी तिला मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तिने इन्स्टाग्रावर एक फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
 
या फोटोमध्ये ती कारच्या खिडकीबाहेर जाऊन मजा करताना दिसत आहे. वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर तिने शाहरुखची भेट घेतली व त्याच्याबरोबर काढलेला एक फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शाहरुखनेदेखील तिच्याबरोबर काढलेला फोटो ट्विट केला आहे. दुआ लीपा ही एक सुंदर युवती आहे. तिचा आवाज खूप सुंदर आहे. तुझ्या कॉन्सर्टसाठी माझ्या शुभेच्छा आणि मी शिकवलेल्या डान्सच्या स्टेप्स स्टेजवर करायला विसरु नको अशा शब्दात त्याने तिची स्तुती केली आहे.