शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (12:08 IST)

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट बंद ठेवून मेणबत्ती, दिवे किंवा मोबाईलचा फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले. 
 
नेहमीप्रमाणे मोदींच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. त्यात बॉलिवूडच्या एका जुन्या चित्रपटाचा फोटो देखील व्हायरल होत आहे. त्या फोटोत सुमारे 70 च्या दशकातील अभिनेते हातात टॉर्च घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. यात कबीर बेदी, फिरोझ खान, विनोद मेहरा, अनिल धवन, संजय खान आणि सुनील दत्त हे सहा अभिनेते हातात टॉर्च घेऊन उभे दिसत आहे. 
 
हा फोटो नागिन या चित्रपटातील असून हे सर्व जंगलात असतानाचा हा दृश्य आहे. हा ‍चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला होता. मोदी यांनी 9 वाजता दिवे घालवून हातात टॉर्च घेऊन उभे राहण्याचा सल्ला दिल्यामुळे हा फोटो व्हायरल होत आहे.