शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (08:48 IST)

अभिनेत्री नीतू कपूर लवकरच चित्रपटात झळकणार

neetu singh
बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर आता लवकरच एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात अभिनेता अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. राज मेहता दिग्दर्शित हा आगामी चित्रपट रोमॅण्टिक-कॉमेडी असून कियारा अडवाणी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर नीतू कपूर आणि अनिल कपूर हे वरुणच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत.
 
दरम्यान, अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. परंतु, चित्रपट दिग्दर्शक राज मेहता आणि ऋषभ शर्मा हे चित्रपटावर काम करत आहेत. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे करीना कपूर, अक्षय कुमार यांच्या गुड न्यूज या चित्रपटाचा हा सिक्वल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.