1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (15:18 IST)

पद्मिनी कोल्हापुरेची पानिपतद्वारे वापसी

padmini kolhapure
सध्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी पानिपत चित्रपटाची तयारी जोरदार सुरू असून त्यांनी भव्य ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. दिग्गज कलाकारांची त्यासाठी त्यांना साथ मिळत आहे. आता यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिचाही समावेश झाला आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. बॉक्स ऑफिसवर 'मोहेंजो दारो' चित्रपट आपटल्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी नव्या चित्रपटाची तयारी केली आहे. 'पानिपत : ग्रेट बेट्रेयल' असे याचे शीर्षक असेल. पानिपत येथे झालेल्या युद्धाची ऐतिहासिक कथा यात मांडली जाणार आहे. यात पानिपतच्या तिसर्‍या लढाईची कथा मांडली जाणार आहे. ग्रेट मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या घनघोर युद्धाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आशुतोषची पत्नी सुनीता आणि रोहित शेलटकर याचे निर्माते आहेत. 6 डिसेंबर 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.