शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 20 ऑगस्ट 2023 (14:12 IST)

Parineeti-Raghav Wedding: या दिवशी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लग्न करणार

Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 25 सप्टेंबरला लग्न करणार आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट 13 मे 2023 रोजी दिल्लीत झाली होती. आता या वर्षी दोघे लग्न करणार आहेत.
 
मात्र, लग्नाच्या तारखेबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की परिणीती चोप्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या लग्नाची तयारी सुरू करेल. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे.
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सध्या 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा दोघेही जुने मित्र असून 2022 पासून त्यांची जवळीक वाढली पंजाबमध्ये 'चमकिला' चित्रपटाचे शूटिंग करत असताना  राघव चढ्ढा परिणीतीला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 
 
बहीण प्रियांका चोप्राप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंतचे लोक लग्नाला उपस्थित राहू शकतात.
 
Edited by - Priya Dixit