गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (12:20 IST)

Indian Idol 12: पवनदीप ठरला इंडियन आयडॉल

प्रसिद्ध सिंगिंग रियलिटी शो 'इंडियन आयडॉल' सीझन 12 संपलं. शो च्या सुरुवातीला अनेकदा वादाच्या भोर्‍यात पडल्यावर यावर कोरोनाचं सावट देखील बघायला मिळालं. कधीकधी प्रतिस्पर्धी कोरोना पॉझिटिव्ह झाले तर नंतर सेटचे स्थान बदलावं लागले. हे सर्व घडूनही शो ने लोकांचे हृदय जिंकले आणि शेवटी शो यशस्वी ठरला. रविवारी 'इंडियन आयडॉल 12' चं ग्रँड फाइनल आयोजित करण्यात आलं आणि विजेतेचे नाव बाहेर आलं आहे. इतर पाच स्पर्धकांना पराभूत करत पवनदीप राजन यांनी पदक पटकावलं. पवनदीपचा 25 लाख रुपये तसेच ट्रॉफीच्या स्वरुपात सन्मान करण्यात आला.
 
फिनालेमध्ये सहा स्पर्धक होते. पवनदीप, अरुणिता कंजलल, कांजीलाल, सायली कांबले, मोहम्मद दानिश, निहाल आणि शनमुखाप्रिया. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या अरुणिता शो जिंकण्याची मजबूत दावेदार सांगितली गेली होती. तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबले, चौथ्या क्रमाकावर मोहम्मद दानिश आणि पाचव्या क्रमांकावर निहाल तर सहाव्या क्रमांकावर शनमुखाप्रिया होती.