Widgets Magazine

ट्रफिक जॅमच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर शूटिंग बंद

अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेल्या पियानो प्लेयर चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्यात आले. पुण्यातील खडकी कॅंन्टोन्मेंट परिसरात शुक्रवारी सकाळीपासून रस्ता बंद करुन चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. रस्ता अडवल्याने परिसरात झाला. याची तक्रार स्थानिकांनी नगरसेविका वैशाली पैहलवान यांच्याकडे केली. त्यानंतर नगरसेविकेचा पती कैलाश पैहलवान यांनी घटनास्थळी जाऊन शुटिंगची परवानगी घेतली आहे का, असा सवाल विचारला. परंतु परवानगीचे कोणतेही परिपत्रक टीमला दाखवता न आल्याने शूटिंग आवरते घेत युनिटने काढता पाय घेतला.
युनिटने वाहतूक पोलिसांकडून विना हरकत पत्र मिळवले होते. मात्र खडकी कॅंटोन्मेंट हा भाग संरक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे केसीबी (खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड)ची संमतीही आवश्‍यक होती.


यावर अधिक वाचा :