शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (11:37 IST)

दिलीप कुमार यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी फोनद्वारे सांत्वन दिलं, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली

बॉलिवूडचे 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांनी 7 जुलैला या जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनाने देशभरात शोकांची लाट उसळली होती. बॉलिवूड सेलेब्स ते राजकारण्यांपर्यंत दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
 
पीएम मोदी यांनी सकाळी बातमी मिळाल्यावर सायरा बानो यांना फोन करुन दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याच वेळी आता सायरा बानो यांनी दिलीप साहब यांच्या मृत्यूबद्दल शोक व सांत्वन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
 
दिलीपकुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत सायरा बानो यांनी लिहिले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जी धन्यवाद, सकाळी फोन करून सांत्वन दिलं - सायरा बानो खान.'