शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2017 (15:35 IST)

देसी गर्ल प्रियंका जखमी

आपल्या देशातील आणि सध्या हॉलीवूडमध्ये  आपला जम बसवलेली  अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एबीसी क्वांटिको या मालिकेच्या सेटवर जखमी झाली आहे. त्यामुळे  तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  प्रकृती आता ठीक असल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. सेटवर जखमी झाल्यानंतर प्रियांकाने काही दिवस आराम करण्याचा निर्णय घेतल्याचे, सेटवरील सूत्रांनी म्हटले आहे.
 
 न्यू यॉर्कच्या सेटवर एक किरकोळ घटना घडली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या घरीच आहे.प्रियांका जखमी झाली असली तरी त्याचा मालिकेच्या चित्रीकरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रियांकाशिवाय सध्या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. जवळपास एक आठवड्यानंतर प्रियांका तिच्या कामाला सुरुवात करू शकणार आहे.