बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 21 मार्च 2018 (10:30 IST)

प्रियंका गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहना

येत्या 23 मार्चपासून चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचा 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून अभिनेते अनुप खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. तर अक्षय खन्ना संजय बारूंच्या भूमिकेत बघावयास मिळेल. तसेच या चित्रपटातील एका नव्या पात्राबद्दलची माहिती समोर आली असून, ते पात्र प्रियंका गांधी यांचे आहे. अभिनेत्री आहना कुारी प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. 'लिपस्टिक अंडर माय बुरका' या चित्रपटासह काही वेब सिरिजध्ये आहनाने काम केले आहे. या चित्रपटासाठी आहनाचा लूक पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन केला आहे. सुनील बोहरा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच विजय रत्नाकर गुट्टा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. संजय बारु 2004 ते 2008 दरम्यान तत्कालीन पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार होते. संजय बारु यांचे पात्र अक्षय खन्ना साकारत असून त्याचा लूकही एकद हटके दिसत आहे.