रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'रेस ३' सोशल मीडियावर लीक

रेस ३ हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला आहे. मल्टीस्टारर अॅक्शनपट असणाऱ्या रेस ३ चं थिएटरमध्ये चित्रीत करण्यात आलेलं व्हर्जन एका फेसबुक युजरने पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर हा व्हिडिओ बऱ्याच ग्रुप्समध्ये आणि फेसबुक युजर्सच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला.
 

ईदच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलमान ‘रेस ३’च्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आला. या चित्रपटाला समीक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. असं असलं तरीही सलमानच्या चाहत्यांनी मात्र चित्रपटगृहांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. ज्याच्या बळावर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यादीत अग्रस्थानी बाजी मारली. चित्रपटाची ही घोडदौड सुरु असतानाच आता सोशल मीडियावर तो लीक झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.