रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आयुष्यमानच्या 'अंधाधुंद'मध्ये राधिका

आर.एस.प्रसन्नाच्या 'शुभंगलसावधान'मधील आयुष्यमान खुराना आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तयार झाला आहे. श्रीराम राघवन यांच्या आगामी सिनेमामध्ये आयुष्यमान एका पियानो वादकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमचे नाव निर्मात्यांनी घोषित केलेले नाही. हे नाव जाहीर करण्यासाठी निर्मात्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यांनी एक व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आहे. त्यामध्ये सिनेमातील सर्व कलाकारांबरोबर टीमचे अन्य सदस्य या सिनेमाच्या शीर्षकाबाबत अंदाज वर्तवताना दिसत आहेत. मात्र या चर्चेनंतर सर्वात शेवटी आयुष्यमान खुराना आणि राधिका आपटे या सिनेमाचे नाव 'अंधाधुंद' असल्याचे जाहीर करतात. अलीकडेच आयुष्यमान खुरानाने इंस्टाग्रामवर एका आंधळ्या पियानो प्लेअरचा फोटो शेअर केला होता. तो फोटो त्याने का पोस्ट केला होता, याचा आता उलगडा झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 'अंधाधुंद'मध्ये आयुष्यमानच्या बरोबर 'पॅडमॅन' गर्ल राधिका आपटेही असणार आहे. तिचा रोल नक्की कसा असेल आणि या रोलसाठी तिला कसे तयार केले गेले, याबाबतचे किस्से लवकरच समजतील. सध्या तरी आयुष्यमानच्या आंधळ्या पियानो वादकाची ही कथा नक्की कशी असेल, याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.