रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :बीजिंग , मंगळवार, 19 जून 2018 (12:51 IST)

शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात चित्रपट 'हिचकी'ची धूम

शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात अभिनेत्री रानी मुखर्जीची मुख्य भूमिका असणारे चित्रपट 'हिचकी'चे फार कौतुक करण्यात आले असून याला बघितल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून ताळ्या वाजवल्या. हे चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थात 16 जून रोजी दाखवण्यात आले होते. यात राणीने टॉरेट सिंड्रोमशी पीडित महिलेची भू‍मिका केली आहे.
 
'हिचकी'चे निर्देशक सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या उपस्थितीत याचे प्रदर्शन करण्यात आले. मल्होत्रा यांनी ट्विट करून सांगितले की परदेशी लोकांद्वारे उभे राहून प्रशंसा करणे फारच मोठी बाब आहे. त्यांनी सबटायटलसोबत चित्रपट बघितले आणि आनंदाश्रु घेऊन बाहेर निघाले. त्यांनी यासाठी एसआयएफएफचा आभार मानला.