गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (08:41 IST)

Rajinikanth: रजनीकांतचा मोठा भाऊ अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज

rajinikanth
रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार आहेत. या सुपरस्टारने दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत आपली अभिनय प्रतिभा सिद्ध केली आहे. अभिनेत्याच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्यानेही इंडस्ट्रीत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. आता त्यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य चित्रपट विश्वात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून सुपरस्टारचा भाऊ सत्यनारायण राव गायकवाड आहे.
 
रजनीकांतचे भाऊ तामिळ चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसल्याचे बोलले जात आहे. कृष्णगिरी येथे मुहूर्त पूजेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. सत्यनारायण राव यांचे वय 80 वर्षे आहे.   
सत्यनारायण राव कदाचित चित्रपट जगतापासून दूर असतील. परंतु, ते मीडियासाठी नवीन चेहरा नाही. 1970 पासून ते रजनीकांत यांचे गुरू आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्या संघर्षाच्या काळात त्यांचे भाऊ सत्यनारायण राव यांनी त्यांना खूप मदत केली होती. असे म्हटले जाते की, सत्यनारायण अनेकदा मुलाखतींमध्येही आपल्या भावाविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात.
 
रजनीकांतही आपल्या भावाचे  खूप आदर करतात. या वर्षी फेब्रुवारी भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते  बंगळुरूलाही पोहोचले  होते. रजनीकांत यांचे सिनेविश्वातील योगदान कोणापासूनही लपलेले नाही. आता त्याचा भाऊही या इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते  त्याच्या आगामी 'जेलर' चित्रपटात व्यस्त आहे.



Edited by - Priya Dixit