testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘न्यूटन’ ऑस्कर स्पर्धेतून बाहेर

newton
Last Modified शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:35 IST)

राजकुमार यादवचा ‘न्यूटन’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ‘ऑस्कर’च्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून अधिकृतपणे ‘न्यूटन’ची प्रवेशिका पाठवण्यात आली होती. वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ला ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीने घेतला होता. ऑस्करने ट्विटरवरून अकॅडमी अवॉर्डच्या ‘फॉरेन लॅग्वेज फिल्म अवॉर्ड’ (परदेशी भाषा) विभागात जागा मिळवणा-या नऊ चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत ‘अ फनटॅस्टिक वूमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘द इनसल्ट’, ‘लव्हलेस’, ‘फेलिसीट’, ‘द स्क्वायर’, ‘द वूंड’ चित्रपटांचा समावेश आहे.

अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘न्यूटन’चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकरने या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच या चित्रपटातून अचूक बोट ठेवले होते.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...