सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (12:35 IST)

'रणबीर कपूर-आलिया भट्ट 15 वर्षात घटस्फोट घेतील'

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जोधपूरमध्ये फिरताना दिसले तेव्हा ते लग्नासाठी जागा शोधत तर नाहीये असा अंदाज बांधला जात आहे अशात तीन महिन्यांपूर्वी केलेल्या एका भविष्यवाणीची आठवण देखील होत आहे.
 
अभिनेता आणि कथित समीक्षक कमल रशीद खान हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. केआरकेचे नाव त्या लोकांपैकी आहे जे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हेडलाईन्समध्ये राहतात. अशा स्थितीत यावेळी केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाबद्दल ट्विट केले होते.
 
KRK चा अंदाज
वास्तविक केआरकेने ट्विटरवर काही भविष्यवाण्या पोस्ट केल्या होत्या, केआरकेने त्याच्या ट्विट्समध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. अशा स्थितीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नातेसंबंधावर केआरकेने भविष्यवाणीही केली आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न जास्तीत जास्त 2022 च्या अखेरीस होईल. पण रणबीर कपूर लग्नाच्या 15 वर्षांच्या आत आलियाला घटस्फोट देईल. म्हणजेच केआरकेच्या मते, रणबीर 2037 पूर्वी आलियाला घटस्फोट देईल.
 
रणबीर-आलियाच्या लग्नानंतर घटस्फोटाचा अंदाज घेतल्यामुळे केआरके सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. लक्षात ठेवा की केआरकेला सोशल मीडियावर ट्रोल केले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याला अनेक वेळा ट्रोल केले गेले आहे.
 
विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कोविडमुळे हा चित्रपट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाले आहेत.