शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (15:55 IST)

रणवीर, दीपिका होणार अलिबागकर; ‘या’ कामासाठी मोजले तब्बल 22 कोटी रूपये

अलिबाग-मापगाव येथे अभिनेता रणवीर सिंग, त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी तब्बल दाेन एकर १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. सुमारे २२ कोटींना हा व्यवहार झाला असून के.ए.एंटरप्रायजेस एलएलपीतर्फे नियुक्त भागीदार दीपिका पदुकाेण आणि आर.एस.वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट प्रा.लि.तर्फे संचालक रणवीर सिंह भावनानी यांनी हा खरेदी व्यवहार केला आहे,असे सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे जी जमीन खरेदी केली आहे तेथे १७ हजार ४५० चाै. फुटांचे घरही आहे. त्यामुळे आता रणवीर आणि दीपिका अलिबागकर झाले आहेत.
 
उद्याेगपती, सिने कलाकार,जागतिक कीर्तीचे खेळाडू यांनाही अलिबागचा माेह आवरलेला नाही.अनेकांनी या ठिकाणी बंगले घेतले आहेत.

काही दिवसापूर्वी अलिबाग-वरसाेली येथे उद्याेगपती रतन टाटा यांनीही वास्तव्य केले आहे.काही चित्रपटांत कलाकारांच्या तोंडून नेहमीच ‘अलिबाग से आया है क्या’ असे संवाद एकात होतो आता हेच कलाकार अलिबागच्या प्रेमात पडले आहे.
 
सोमवारी दीपिका आणि रणवीर हे खरेदी-विक्री व्यवहारासाठी अलिबागच्या मुख्य दुय्यम निबंधक कार्यालयात आले हाेते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली हाेती.यावेळी रणवीरने आपला चेहरा मास्क आणि अंगात परिधान केलेल्या हुडीने झाकला हाेता, तर दीपिकानेही मास्क परिधान केला हाेता.