शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (11:50 IST)

प्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका

आपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया सध्या एका हिंदी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे नाव 'श्रीदेवी बंगलो' असे आहे. यात ती सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रिझर प्रदर्शित करण्यात आला. या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबध्ये झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट श्रीदेवी यांच्यावरच आधारित असल्याचे स्पष्ट होते. प्रिया प्रकाश हिने याबद्दल थेट बोलणे टाळले आहे. 'श्रीदेवी बंगलो' चित्रपटाची कथा  स्त्रीप्रधान आणि थोडी वेगळ्या धाटणीची असल्याने हा चित्रपट स्वीकारला. मी यात श्रीदेवी नावाच्या एका लेडी सुपरस्टारची भूमिका करतेय. मात्र, हा चित्रपट अभिनेत्री श्रीदेवींच्या जीवनावर आधारित आहे की नाही हे लोकच ठरवतील, असं ती म्हणाली. चित्रपटाचा काही भाग लंडनध्ये चित्रित झाला असून हे शूटिंग संपवून प्रिया नुकतीच भारतात परतली आहे.