सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'एस दुर्गा' चा रिलीज होण्‍याचा मार्ग अखेर मोकळा

'एस दुर्गा' या विवादित मल्‍याळम चित्रपट रिलीज होण्‍याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सेन्‍सॉर बोर्डाने चित्रपट रिलीज करण्‍यास परवानगी दिल्‍यामुळे चित्रपटाचे दिग्‍दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे. शशिधरन यांनी ट्‍विट करून ही माहिती दिली आहे. शशिधरन 'एस दुर्गा' मार्च किंवा एप्रिलमध्‍ये रिलीज करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत.
 
गेल्‍या वर्षी गोव्‍यात आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात एस दुर्गा रिलीज करण्‍यात आला नव्‍हता. तेव्‍हापासून या चित्रपटाचा वाद निर्माण झाला. दिग्‍दर्शकाला हा चित्रपट रिलीज करण्‍यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. नोव्‍हेंबर २०१७ मध्‍ये त्‍यांनी केरळ उच्‍च न्‍यायालयातही धाव घेतली होती.