testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दीपिकाला पश्चाताप

जवळपास 10 वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. एकापाठोपाठ एक अशा तिच्या सात चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईत 100 कोटींचा आकडा पार केला. राम-लीला, बाजीराव मस्तानी, ये जवानी है दिवानी आणि पद्मावत अशा दमदार चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली.
स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवतानाच तिला काही अपयशसुद्धा पचवावे लागले. अशाच एका अपयशाचा तिला आजही पश्चाताप होतो. अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये दीपिकाने तिच्या बहिणीसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या आणि काही खुलासेसुद्धा केले. करिअरमधला एक असा चित्रपट ज्याची ऑफर स्वीकारल्याचा आजही तिला पश्चाताप होतो याबद्दल दीपिका बोलत होती आणि तो चित्रपट होता चांदनी चौक टू चाइना.
2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ती अक्षयकुमारसोबत दुहेरी भूमिकेत झळकली होती. निखिल अडवाणी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्या आपटला होता. महणूनच त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचे दीपिकाने म्हटले.

या शोमध्ये नेहासोबत साधलेल्या संवादातून दीपिका आणि कतरिनामधील शीतयुद्ध अजूनही संपलेलं नसल्याचं चित्र दिसून आलं. नेहाने जेव्हा तिला विचारले की तुझ्या लग्नाला कतरिना कैफला आमंत्रित करशील का? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिने साफ नकार दिला. त्यामुळे रणबीर कपूरमुळे निर्माण झालेला या दोघींमधील वाद अजूनही शमला नाही हे स्पष्ट झाले.


यावर अधिक वाचा :

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

national news
अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार ...

सलमानच्या शेरेबाजीमुळे जॅकलीनचा चेहरा उतरला

national news
जॅकलीन फर्नांडिसने आतापर्यंत डझनभर सिनेमे केले आहेत. पण अजूनही तिला स्पष्ट, शुद्ध हिंदी ...

पुणेरी झटका

national news
सिनेमाच्या मध्यांतरानंतर अंधारात आपल्या आसनावर परतत असलेल्या जोशी काकूंनी कोपर्‍यातल्या ...