शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 25 एप्रिल 2020 (21:21 IST)

'गॉड ऑफ क्रिकेट' चे मोशन पोस्टर प्रदर्शित

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा नुकताच  ४७वा वाढदिवस होता.  त्याला त्याच्या वाढदिवासानिमित्त अत्यंत चांगली भेट मिळाली आहे. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत 'गॉड ऑफ क्रिकेट' (God of cricket) या आगामी चित्रपाटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरला निर्माता महेश भट्टने आवाज दिला आहे. 
 
चित्रपटाचा मोशन पोस्टर अनेक उभरत्या कलाकारांना प्रेरणा देणारा आहे.  "जब गॉड ने कहा खेलना है तो बस खेलना है." असं वाक्य म्हणताना एका लहान क्रिकेटरमधील खेळा प्रती असलेलं प्रेम आणि आवड व्यक्त होताणा दिसत आहे. खुद्द महेश भट्ट यांनी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे.
 
हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'एका खरा हिरोच समजू शकतो की सध्या वादळ आहे, पण पाऊस कायम राहत नाही.' गॉड ऑफ क्रिकेट' चित्रपटाचं पहिलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.