रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (10:12 IST)

'राधे' चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा दिशा पाटनी

अभिनेता सलमान खान 'दबंग ३' चित्रपटासोबतच सलमान त्याच्या 'राधे' चित्रपटामध्ये देखील व्यस्त आहे. चित्रपटाची शूटींग सध्या जोरदार सुरू आहे.सलमानने त्याच्या सोशल मीडियावरून एक फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण चित्रपटाची कास्ट समोर आली आहे. चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पाटनी भूमिका साकारणार आहे. 
 
दिशा आणि सलमान त्यांच्या आगामी 'राधे' चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. 'भारत' चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते.  'राधे' येत्या वर्षात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली होती. सोहेल खान 'राधे' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर 'राधे'मधून सलमान आणि प्रभु देवा तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.