शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (15:04 IST)

संजय दत्त उपचारासाठी यूएसला जाणार, व्हिजा मिळाला

कॅन्सरग्रस्त अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर तो उपचारासाठी अमेरिकेला जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती आहे. दरम्यान आता संजय दत्त अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजाही मिळालेला आहे.
 
संजय दत्त लवकरच उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. त्याला 5 वर्षांचा यूएस व्हिजा मिळाला आहे. लवकरच तो न्यूयॉर्कसाठी रवाना होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार होणार आहेत. जिथं त्याची आई नर्गिस दत्त यांच्यावर उपचार झालेले होते. नर्गिस यांनाही कॅन्सर होता.