सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सपना चौधरी अन्‌ राखी सावंत WWE च्या रिंगध्ये नाचतात तेव्हा...

गेल्या काही दिवसांत सपना चौधरीचा अंदाजचं बदललाय. अगदी लूकपासून तर तिच्या स्टाइलपर्यंत. तशीही सपनाची लोकप्रियता कमी नव्हतीच. पण आजकाल तिची लोकप्रियता आणखीच वाढलीय. हेच कारण आहे की, देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात तिचा डान्स होवो, लगेच तिचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सपना चौधरी चक्क WWEच्या रिंगध्ये डान्स करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ आहे हिमाचल प्रदेशातील मंडी या गावातला. मंडी येथे WWEची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याइव्हेंटला बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही हजर होती. दोघीही व्हिडिओत तुफान डान्स करताना दिसत आहेत.