1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सारा अली खानचे नखरे

sara ali khan look in kedarnath
सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे पण चित्रीकरण जसे जसे पुढच्या टप्प्यात जात आहे तसे साराचे नखरेही वाढत जात असल्याचे म्हटले जात आहे.
 
सारा तिच्या लूकबाबत जरा जास्तच सजग आहे. त्यामुळे तिला हव्या असलेल्या लूकनुसार ती कॅमेर्‍यासमोर येणे पसंत करते. शिवाय तयार होण्यासाठीही ती बराच वेळ घेते. तिच्या या सवयीमुळे सेटवर अनेकांना ताटकळत राहावे लागते. इतकेच नव्हे तर ती आपल्या प्रत्येक लूकचे फोटो काढून ते फोटा एका व्यक्तीला पाठवते आणि त्या व्यक्तीकडून सल्ला घेऊन त्यानुसार ती पुन्हा आपला लूक बदलते. यावर दिग्दर्शक अभिषेकने स्पष्ट शब्दांत तिची कानउघडणीही केल्याचे समजते.