बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (12:40 IST)

Shamita-Raqesh Breakup:शमिता शेट्टी-राकेश बापट यांनी तोडले नाते, झालं ब्रेकअप

Shamita-Raqesh Breakup: शमिता शेट्टी आणि राकेश बापट ही जोडी गेल्या वर्षी टीव्ही सेलिब्रिटींच्या जोड्यांमध्ये सर्वात रोमँटिक जोडपे म्हणून सर्वांचा समोर आली. ही जोडी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. राकेशने शमिताला खूप सपोर्ट केला, लोकांना तिचा केअरिंग बॉयफ्रेंड लूक आवडला. यानंतर शमिता शेट्टी 'बिग बॉस 15' ची स्पर्धक बनली, जिथे राकेश बापटलाही वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. 'बिग बॉस 15' नंतरही हे कपल एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले.  
 
लोक दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र यादरम्यान या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या ब्रेकअपची घोषणा केली आहे. 
 
काही दिवसांपूर्वी शमिता आणि राकेश यांच्यात विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या जोडप्याने ही अफवा असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी राकेश आणि शमिताने स्वतः ब्रेकअपची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये बनलेली ही जोडी लोकांना खूप आवडली होती. दोघांमधील प्रेम लोकांनी स्वतः पाहिले. पण 1 वर्षानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि नाते संपुष्टात आले. 
 
शमिता आणि राकेश यांनी ब्रेकअपची घोषणा केली आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. शमिता आणि राकेश यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. ते आता एकत्र नाहीत. 
 
हे नाते तुटल्याची बातमी देताना शमिताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले, 'मला हे सांगणे आवश्यक वाटते... राकेश आणि मी आता एकत्र नाही... आणि काही काळापासून नाही, पण हा म्युझिक व्हिडिओ त्या सर्व सुंदर चाहत्यांसाठी आहे. ज्यांनी आम्हाला खूप प्रेम केले आणि पाठिंबा दिला त्यांच्यासाठी. तुमच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर असाच करत राहा. ती म्हणजे सकारात्मकता. तुम्हा सर्वांचे आभार .'
 
शमिताची पोस्ट समोर येताच राकेश बापट यांनीही इन्स्टा स्टोरीवर या ब्रेकअपलाही दुजोरा दिला. राकेशने लिहिले की, 'मला सांगायचे आहे की आता शमिता आणि मी एकत्र नाही. नशिबाने आम्हाला अतिशय असामान्य परिस्थितीत भेटवले. सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल #ShaRa परिवाराचे खूप खूप आभार. एक खाजगी व्यक्ती म्हणून, आम्ही वेगळे झालो आहोत हे मला जाहीरपणे सांगायचे नव्हते, तरीही मला वाटले की मी माझ्या चाहत्यांना कळवावे. मला माहित आहे की या बातमीनंतर फॅन्सला दुःख होईल. परंतु आशा आहे की तुझे वेगळे होऊनही असाच  प्रेमाचा वर्षाव करत राहणार.आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार. .