शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:50 IST)

अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून बहुप्रतिक्षित बायोपिक चित्रपट 'शंकुतला देवी' ३१ जुलै २०२० रोजी होणार प्रदर्शित!

अमेझॉन प्राईम व्हिडिओने आज फक्‍त स्ट्रिमिंग सेवेवर बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट 'शंकुतला देवी'च्‍या जागतिक प्रिमिअरची घोषणा केली. दिग्दर्शक अनु मेनन (वेटिंग, फोर मोअर शॉट्स प्‍लीज सीझन १) यांचे दिग्‍दर्शन आणि सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स प्रॉडक्‍शन्‍स व विक्रम मल्‍होत्रा (एबंडंशिया एंटरटेन्‍मेंट) यांची निर्मिती असलेल्‍या या आत्‍मचरित्रात्मक चित्रपटात राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कार विजेती अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत असणार आहे. तिने 'मानवी संगणक' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या जगप्रसिद्ध भारतीय बुद्धिमानी गणितज्ञाची भूमिका साकारली आहे.
 
‘शंकुतला देवी’ चित्रपटामध्‍ये सन्‍या मल्‍होत्रा (दंगल, बधाई हो) देखील आहे. ती शंकुतला देवीच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्‍या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता (मर्दानी २) आणि अमित साध (ब्रीद, काय पो चे) हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केले असून इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे.
 
भारतातील आणि जगभरातील २०० हून अधिक देश व प्रदेशांमधील प्राईम सदस्‍य ३१ जुलैपासून 'शंकुतला देवी'ची लक्षवेधक कथा पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात. प्राईम व्हिडिओ विभागामधील हजारो टीव्‍ही कार्यक्रम आणि हॉलिवुड व बॉलिवुडमधील चित्रपटांमध्‍ये 'शंकुतला देवी' या चित्रपटाची भर पडणार आहे.
           
प्राईम व्हिडिओ या विभागामध्‍ये भारतीय चित्रपट 'गुलाबो सिताबो', 'पेंग्विन', 'पोन्‍मगल वंधल'चे जागतिक प्रिमिअर्स, भारतीय निर्मित अमेझॉन  ओरिजिनल सिरीज जसे 'फोर मोअर शॉट्स प्‍लीज!', 'पाताल लोक', 'दि फरगॉटन आर्मी - आजादी के लिए', 'दि फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'इनसाइड एज' व 'मेड इन हेव्‍हन' आणि पुरस्‍कारप्राप्‍त व समीक्षकांद्वारे प्रशंसित जागति‍क अमेझॉन सिरीज जसे 'टॉम क्‍लेन्‍सीज जॅक रायन', 'दि बॉईज', 'हंटर्स', 'फ्लीबॅग' आणि 'दि मार्वलस मिसेस मैसेल' यांचा समावेश आहे.